‘..तर मोदी सत्तेत आल्यावरही शेअर बाजार 10-20 टक्क्यांनी घसरेल’, ‘मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात..’

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं नाही तर शेअर बाजाराला मोठा फटका बसेल असा अंदाज यापूर्वीही अनेकांनी व्यक्त केला आहे. मात्र आता मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलं तरी किती जागा हे सरकार मिळवणार यावरही बरंच काही अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे. गुंतवणूकदार रुचिर शर्मा यांनी, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला यंदाच्या लोकसभा निवडणुकीमद्ये 250 पेक्षा कमी जागा मिळाल्या तरी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. रॉकफेलर इंटरनॅशनलच्या अध्यक्ष असलेल्या रुचिर यांनी मुंबईतील ‘इंडिया टुडे’च्या ‘पॉप अप कॉनक्लेव्ह’ कार्यक्रमात ही शक्यता बोलून दाखवली. भाजपाला 250 पेक्षाही कमी जागा मिळाल्या तर शेअर बाजारामध्ये 10 ते 20 टक्क्यांची घसरण पाहायला मिळेल असं, रुचिर म्हणाले आहेत.

सर्वाधिक अब्जाधीश असूनही…

भारतामधील शेअर बाजार हा जगातील सर्वात महागड्या शेअर बाजारा असून त्यामुळेच परदेशी गुंतवणूकदार मोठ्याप्रमाणात भारताकडे आकर्षित होत आहेत. मात्र प्रत्यक्षात एफडीएअंतर्गत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अधिक सुधारणेची गरज आहे. एफडीएची सध्याची अर्थव्यवस्थेमधील टक्केवारी ही जीडीपीच्या 1 टक्का इतकी आहे, असं रुचिर म्हणाले. मागील पाच वर्षांमध्ये भारतात मोठ्याप्रमाणात संपत्ती निर्माण झाली आहे. ही संपत्ती प्रामुख्याने घरगुती संपत्तीमुळे तयार झाली असून त्यामध्ये परदेशी गुंतवणुकीचा अल्प वाटा आहे, असं रुचिर म्हणाले. जगातील सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या भारतामध्ये कमाईमधील तफावत ही मोठी समस्या असल्याचं जागितक स्तरावर बोललं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *