अहमदनगरमध्ये एका आईनं आपल्या सहा महिन्याच्या पोटच्या मुलीची इमारतीवरुन खाली फेकून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना शिवाजीनगर परिसरात काल संध्याकाळी घडली.
शरद आणि सुनीता राऊत दाम्पत्याला तीन मुली असून घरगुती कारणांवरुन त्यांच्यात भांडण झालं. त्यामुळं संतप्त सुनीतानं इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन मुलीला खाली फेकून दिलं. त्यात त्या सहा महिन्याच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी रात्री उशीरा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सुनीताला अटक केली आहे. राऊत दाम्पत्याला आधीही दोन मुली असून सहा महिन्यापूर्वीच तिसरी मुलगी झाली होती. त्यामुळं या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

