पालघर जिल्हातील तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक ए. एन. मूल्ला यांच्यावर भर चौकात चाकू हल्ला करण्यात आलाय.
गुरुवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद नॅशनल हायवेवरील तलासरी पूलाजवळ दहा ते पंधरा जणांनी पोलीस उपनिरिक्षक मूल्ला यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. याहल्ल्यामध्ये मूल्ला गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान पोलीस उप निरीक्षक ए.एन.मुल्ला यांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर तलासरी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
तलासरीतील ओव्हर लोड ट्रक पास करणाऱ्या दलालांच्या टोळीनं हा हल्ला केला असल्याचं बोललं जातंय. दरम्यान याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

