शाहू महाराजांना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची १०० कोटी रुपयांची बोली

छत्रपती शाहू महाराज यांचा कोल्हापूरमध्ये पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैसे वाटत होते. त्याकरिता मुख्यमंत्री एका हॉटेलमध्ये शंभर कोटी रुपये घेऊन बसले होते. असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी ठाण्यातील सभेत केला.\

ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. घटनाबाह्य मुख्यमंत्री मोदींच्या सहावासात गेल्यापासून खोट बोलायचे, रेटून बोलायचे असे वागत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मुलाला ठाण्यात उभे करायला पाहिजे होते. ज्या ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे तिथे मशालीचा विजय होणार आहे. चोरीचा माल पचणार नाही असे राऊत म्हणाले.

४ जून नंतर शिंदे पळतील. स्वतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देश सोडावा लागेल. या दोघांचेही पारपत्र जप्त करा. ब्रिटिशांनी लुटला नसेल एवढा देश या लोकांनी दहा वर्षात लुटला आहे . असे राऊत यांनी सांगितले महाराष्ट्रत चित्र बदलत आहे असे राऊत म्हणाले.

इंडिया आघाडीच्या देशात ३२० हून अधिक जागा

भाजपा देशात १५० पार करू शकत नाही. इंडिया आघाडीच्या देशात ३२० हून अधिक जागा निवडून येतील. असा विश्वास संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला. आनंद दिघे यांच्यावर तयार करण्यात आलेला खोटा चित्रपट हा त्यांचा अपमान आहे. ठाणेकर अशा व्यक्तींना माफ करणार नाही.असे राऊत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *