ठाण्यात तरुणीवर हल्ला

ठाण्यात तरुणीवर हल्ला

ठाणे : येथील घोडबंदर रोडवरील सिनेवंडर मॉलच्या पार्किंगमध्ये सुजीत घावट (२६) या तरुणाने २१ वर्षांच्या तरुणीवर चाकूने वार केले. ही घटना मंगळवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. जखमी युवतीला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, सुजीतला कापूरबावडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मॉलमधील एका दुकानात हे दोघे काम करत होते. काही दिवसांपूर्वी सुजीतने नोकरी सोडली होती. मंगळवारी संध्याकाळी सुजीतने या तरुणीला भेटण्यासाठी पार्किंग मॉलमध्ये भेटायला बोलावले. तिथे त्यांच्यात भांडण झाले व सुजीतने तिच्यावर चाकूहल्ला केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *