भरधाव टेम्पोची पादचाऱ्यासह दुचाकीला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

भिवंडी या महामार्गावर बुधवारी रात्री आठच्या सुमारास एका टेम्पो चालकाने अक्षरशः उच्छाद मांडला असून बेदरकारपणे वाहन चालविल्याने घडलेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या अपघातांत जवळ्पास पाच जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

बोईसर येथुन भिवंडीच्या दिशेने निघालेल्या लहान टेम्पोने वैतरणा नदी पुलाजवळ एका दुचाकीला हुलकावणी दिली. यावेळी टेम्पोला थांबण्याचा इशारा दिल्याने टेम्पो चालकाने अधिक वेग धारण केला. शिरीषपाडा येथे एका पादचाऱ्यासह दुचाकीला धडक देऊन नेहरोली गावाजवळ अन्य एका दुचाकीला धडक देऊन दुचाकी टेम्पोला अडकल्याने टेम्पो जागेवर थांबला.

अपघातांच्या भीषण मालिकेत खूपरी गावातील अशोक रुपजी कलिंगडा, अलका कलिंगडा, वय २५ तसेच शिरीषपाडा येथील पादचारी अजिंक्य रामचंद्र बेरडे, वय ३१ अशा तिघांचा मृत्यु झाला आहे. या अपघातांमध्ये अजित कलिंगडा, वय १२,
माधव सवर रा.खुपरी जखमी असून अन्य किमान चार ते पाच अज्ञात जखमी झाले आहेत. बेजबाबदार चालक आनंद पिराजी मेंढेकर, वय २५ रा.नांदेड याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून त्याने हा प्रकार नेमका कशामुळे केला तसेच अन्य काही अपघातांचा यात समावेश आहे का याचा तपास वाडा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *