मुंबईच्या प्रवासमार्गांमध्ये मागील काही वर्षांत सातत्यानं झालेल्या बदलांमुळं शहरातील वाहतुकीला आधुनिकीकरणाची जोड मिळाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. अशक्य वाटणारे रस्तेही आता जोडण्यात आल्यामुळं शहराचा मुख्य भाग आणि उपनगरंही जवळ आली आहेत. यामध्ये सध्या महत्त्वाच्या भूमिकेत असणारा शहरातील एक रस्ता म्हणजे, कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्ग.
लोकार्पण झाल्या दिवसापासून या मार्गावरून महिन्याभरात जवळपास सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला. वाहनांचा सरासरी आकडा घ्यायचा झाल्यास दर दिवशी या मार्गावरून 19500 वाहनं प्रवास करतात. अशा या शहरातील मुख्य भागांना जोडणाऱ्या कोस्टल रोडवरून येत्या काळात एका दिवसात 90 हजार किंवा त्याहून अधिक वाहनंही धावू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एक बदल ठरणार कारणीभूत
