शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विरोधात ED नं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेनं गुरुवारी म्हणजे आज 18 एप्रिल रोजी राज कुंद्राची 97 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीनं ज्या मालमत्तेला अटॅच केलं आहे. त्यात शिल्पा शेट्टीता जुहूत असलेल्या बंगला देखील आहे. तिचा पती राज कुंद्रा याच्यावर ED नं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. त्यांच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्या दोघांची मिळून एकूण 97.79 कोटींची संपत्ती ईडीनं यावेळी अटॅच केली आहे.

ईडीनं बिटकॉइन पॉन्जी स्कॅम अंतर्गत राज कुंद्राविरोधात ही अॅक्शन घेतली आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत पुण्यातील एक बंगला आणि इक्विटी शेयर देखील आहेत. दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की ईडीनं मराहाष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांकडून वन वेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाजसोबत इतर लोकांना विरोधात तक्रार दाखल केली असून या संबंधीत तपास सुरु केला होता. या सगळ्यांवर हा आरोप आहे की त्यांनी बिटकॉइन्सच्या रुपात लोकांकडून खूप मोठी रक्कम मिळवली आणि बिटकॉइनच्या रुपात दर महिन्याला 10 टक्के परत करण्याचं वचन दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *