श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी सलग 9व्यांदा अव्वल स्थानी!

श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी सलग 9व्यांदा अव्वल स्थानी!

उद्योगपती मुकेश अंबानी सलग नव्यांदा देशातील श्रीमंत लोकांच्या यादीत आपलं स्थान टिकवून आहेत. तब्बल एकशे सत्तावीस हजार करोड (18.9 अब्ज डॉलर) एवढी मुकेश अंबानी यांची संपत्ती असल्याचं वृत्त फोर्ब्स इंडिया या मासिकानं प्रकाशित केलं आहे.

दरवर्षी फोर्ब्स इंडिया या मासिकातर्फे देशातील सर्वाधित श्रीमंतांची यादी जाहीर करण्यात येते. रिलाईन्स इंडस्ट्रीजचे संचालक असलेले मुकेश अंबानी गेली नऊ वर्ष सलग या श्रीमंत लोकांच्या यादीत आहेत. तर फार्मा क्षेत्रातील दिग्गज दिलीप संघवी हे दुसऱ्या स्थानी आहेत. 18 अब्ज डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. तर प्रसिद्ध उद्योगपती अजीज प्रेमझी हे तिसऱ्या स्थानी असून त्यांची 15.9 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे.

या यादीमध्ये फ्लिपकार्ट कंपनीचे संचालक सचिन बन्सल आणि बिनी बन्सल यांचाही यावेळी समावेश करण्यात आला आहे. यंदा या यादीमध्ये 12 नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *