नरेंद्र मोदींच्या अध्यात्मिक गुरूंचं निधन

नरेंद्र मोदींच्या अध्यात्मिक गुरूंचं निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अध्यात्मिक गुरू स्वामी दयानंद गिरी यांचं निधन झालं आहे. बुधवारी आश्रमात दीर्घकालीन आजाराने त्याचं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते.

स्वामी दयानंद यांच्यावर यांना उपचारासाठी दहा दिवसांपूर्वी जॉलीग्रन्ट हिमालयन हॉस्पिटलला हलवण्यात आलं होतं. मात्र तरीही त्यांची प्रकृती वेगाने खालावत होती.

अध्यात्मिक गुरू स्वामी दयानंद गिरी मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. नरेंद्र मोदी यांनी ११ सप्टेंबर रोजी आश्रमाला भेट देऊन, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *