नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?

घरातील मत्स्यालयात ठेवल्या जाणाऱ्या सकर या शोभिवंत माशाला नदी, तलावात सोडल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. सकर मासा अन्य माशांची अंडी, पिले खात असल्याने नदी, तलावातील अन्य माशांचा अधिवासच धोक्यात आला असून, प्रदूषित पाण्यातही सकर मासा तग धरत असल्याचे समोर आले आहे.

चेक युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ सायन्सेस प्राग आणि पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातील संशोधक चांदनी वर्मा, मनोज पिसे, तुषार खरे, प्रदीप कुमकर आणि लुकाश कालोस यांच्या चमूने सकर माशासंदर्भात संशोधन केले. या संशोधनाचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ व्हर्टिब्रेट बायोलॉजी’मध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनातून महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये, तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये सकर माशाचे अस्तित्त्व आढळून आले. सकर माशाच्या संशोधनासाठी आय इकॉलॉजी या तंत्राचा उपयोग करण्यात आला. त्यात इंटरनेट, समाजमाध्यमांत असलेली छायाचित्रे, चित्रफिती वापरून मॅपिंग करण्यात आले. तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष नमूने घेऊन अभ्यास करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *