अभिनेत्री जुहू चावला, अभिनेता अनिल कपूर आणि जितेंद्र या बड्या सेलिब्रटींना मुंबई महापालिकेने नोटीस धाडली आहे. आलिशान जुहू आणि मलबार हिल परिसरात राहणाऱ्या या सेलिब्रिटींच्या घरी डेंग्यूची उत्पत्ती स्थान आढळून आल्याने त्यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
जुही चावलाच्या ऑर्नामेंट पॉटसमध्ये, जितेंद्रच्या घरातील कृत्रिम कारंजामध्ये डेंग्यूचे डास आढळले आहेत. दरम्यान अमिताभ, रणजित, शिल्पा शेट्टी, संजय खान यांच्याही घरांची तपासणी करण्यात आली. मात्र, तिथं डेंग्यूची उत्पत्ती आढळली नाही. ऐन सणासुदीच्या काळात मुंबईत डेंग्यूचे अडीच हजार रुग्ण आढळल आहेत. त्यात 3 जणांचा मृत्युही झाल्याचं समोर आलं आहे.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईला डेंग्यूच्या विघ्नाने हैराण केलंलं असताना आता सेलिब्रेटींच्याही घरात डेंग्यूचे डास सापडले आहेत. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे तब्बल अडीच हजार रुग्ण आढळले आहेत. तर तिघांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला आहे. सध्याची मुंबई डेग्यूच्या साथीमुळे हैराण झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
दरम्यान, वेळीच डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत डेंग्यूचा फैलाव होऊ नये आणि डासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना डास प्रतिबंधक मलम लावून बाहेर फिरण्याचा सल्ला महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना दिला आहे.

