श्रीदेवीची कन्या जान्हवी सलमानसोबत झळकणार मोठ्या पडद्यावर

श्रीदेवीची कन्या जान्हवी सलमानसोबत झळकणार मोठ्या पडद्यावर

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची ग्लॅमरस मुलगी जान्हवी ही आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. जान्हवी लवकरच दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार डी सलमानबरोबर सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

दिग्दर्शक केवी विजेंद्र प्रसाद यांनी आपल्या पुढील चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी जान्हवी आणि सलमान यांच्याशी संपर्क साधला आहे. हा चित्रपट मल्याळम, तमिळ, तेलुगू व हिंदी भाषेतून असेल.

केवी विजयेंद्र प्रसाद यांनी ‘बाहुबली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची स्क्रिप्ट लिहीली आहे. तरी अधिकृतरित्या अद्याप कोणीही या चित्रपटाची घोषणा केली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *