मुंबई पोलीस दलातील पोलीस नाईक चंद्रकांत गवारे याने त्याच्या साथिदारांसह मुंबई नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या एका टेम्पोमधील पाच कोटी ४० लाख रुपये लुटून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस असल्याची बतावणी करून त्यांनी हा प्रकार केला आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी चंद्रकांत गवारे याच्यासह १२ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेली ५० टक्के रक्कम जप्त केली आहे. त्याच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
ही रोकड जळगाव येथील सराफा व्यापाऱ्याची असून मुंबईमधील एका व्यापाऱ्याला देण्यासाठी ही रोकड नेली जात होती असे पोलिसांनी सांगितले. परंतु निवडणुकीपूर्वी इतकी मोठी रोकड टेम्पोतून नेली जात असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या वास्तुविशारदाला महापालिकेने सल्लागार पॅनलवर घेतले. या वास्तुविशारदाने नातेवाईक असलेल्या ठेकेदाराशी संगनमत करून उद्यानाच्या पुनर्विकासाचे कंत्राट मिळविले. काम करताना निविदेतील अटी-शर्तीनुसार साहित्य वापरले गेले नाही. हलक्या दर्जाचे, निकृष्ट साहित्य वापरून काम पूर्ण केले. देयक मात्र निविदेतील अटी-शर्तीनुसार देण्यात आले आहे. एक कोटी ६६ लाख रुपयांचे देयक ठेकेदाराला दिले आहे. यात ठेकेदाराने एक कोटी २० लाख रुपयांची लूट केल्याचा आरोप भापकर यांनी केला.
याबाबत आयुक्तांकडे दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी तक्रार केली होती. परंतु, यावर अद्यापही कारवाई केली नाही. आयुक्तांनी उद्यानात झालेल्या कामाच्या दर्जाची पाहणी करावी. संबंधित वास्तुविशारद, स्थापत्य, उद्यान, विद्युत, लेखापरीक्षक व निविदा प्रक्रियेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
काम चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. ठेकेदाराचे देयक दिले आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर उपअभियंत्याकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सह शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.
