अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर मात करत रणजी ट्ऱॉफीवर नाव कोरलंय. मुंबईचं हे तब्बल 42 वं रणजी जेतेपद ठरलंय. अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भासमोर 538 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण विजयाचा पाठलाग करणारा विदर्भाचा संघ 368 धावांवर गारद झाला. मुंबईने तब्बल 169 धावांनी विजय मिळवला. विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरने 102 धावांची झुंजार खेळी केली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
विदर्भाची विजयसाठी झुंज
दुसऱ्या डावात मुंबई संघाकडून युवा मुशीर खानने 136 धावांची शतकी खेळी केली. त्याला श्रेयस अय्यर 95 आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने 73 धावा करत चांगली साथ दिली. मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 538 धावांचं लक्ष विदर्भासमोर ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाच्या अथर्व तावडे आणि ध्रुव शौरीने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 64 धावांची भागिदारी केली. पण अथर्व 32 धावांवर तर ध्रुव 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.
अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर मात करत रणजी ट्ऱॉफीवर नाव कोरलंय. मुंबईचं (Mumbai) हे तब्बल 42 वं रणजी जेतेपद ठरलंय. अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भासमोर 538 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण विजयाचा पाठलाग करणारा विदर्भाचा संघ 368 धावांवर गारद झाला. मुंबईने तब्बल 169 धावांनी विजय मिळवला. विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरने102 धावांची झुंजार खेळी केली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.