अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दारू पिऊन एका 25 वर्षीय तरूणीनं चांगलाच उच्छाद मांडला. मुंबईत लालबागच्या आयटीसी हॉटेलजवळ या तरूणीनं दारूच्या नशेत राडा केला.
ही तरुणी दादरहून अंधेरीला टॅक्सीनं पोचली अंधेरीत पोचल्यावरही तिने पुन्हा एकदा राडा केला. त्यानंतर अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी या तरूणीला ताब्यात घेतलं. कहर म्हणजे पोलीस ठाण्यातही या तरूणीनं दारू पित पोलिसांच्या नाकी नऊ आणले.
या तरूणीजवळ कुठलंही ओळखपत्र नाही. कधी ती आपलं नाव सुनिता यादव सांगत होती तर कधी रिया खान सांगत होती. पोलीस ठाण्यात सगळ्यांसमक्ष दारु पिऊन राडा केल्यानंतर 1200 रुपये दंड घेऊन पोलिसांनी या तरूणीला सोडून दिलं.

