तीन मिनिटात संपूर्ण ब्राम्हणांना…’ धमकी देणाऱ्या जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल

मराठा आरक्षणासाठीचं उपोषण आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी  केलीय. 3 मार्चपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय. अंतरवालीसह राज्यातील आंदोलनाविरोधातली दडपशाही थांबवण्यासाठी तसंच सगेसोयरे कायद्यासाठी आजपासून पंतप्रधान, राष्ट्रपती यांना ईमेल करा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय.  मनोज जरांगेंनी सरकारला नवा इशारा दिलाय, मला अटक केली तर महाराष्ट्रात जागोजागी मराठे उपोषणाला बसतील असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला सरकारचा सगेसोयरे विषयावर चर्चाच करायची नाही, तोडगाच काढायचा नाही असा आरोपही जरांगेंनी केलाय..

जरांगे समर्थकावर गुन्हा
दरम्यान, जरांगेसमर्थकावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन मिनिटात अख्या ब्राह्मणांना संपवू अशी धमकी या तरुणाने दिली होती. काही दिवसांपासून तीन मिनिटात संपूर्ण ब्राह्मण समाज संपवून टाकू अशी धमकी देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. याच प्रकरणी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे या तरुणावर  भा.द.वी. 153 अ व 506 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

 मनोज जरांगे यांचं स्पष्टीकरण
मी त्याला एकट्याला बोललो आहे ब्राम्हण समाजाला नाही, असं स्पष्टीकरण जरांगे पाटील यांनी दिलं आहे.  त्यांनी धोका दिलाय म्हणून त्यांना बोललो, मात्र तुम्ही नेत्या कडून बोलताय, गोर गरिबांची तुम्ही फसवणूक करताय असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. मराठा समाजात गरसमज नको, काय चौकशी व्हायचा होऊ द्या, 3 मार्च पर्यंत आपण आपले कार्यक्रम स्थगित केले आहे त्याऐवजी गावागावात धरणे आंदोलन करा, असं जारंगे पाटील यांनी सांगितलं आहे.  सरकारची दडपशाही सुरुय, गृह मंत्र्यांनी अंतरवलीत मंडप काढायचे आदेश दिले, तो मंडप मराठ्यांची अस्मिता आहे, सरकारला गृह मंत्र्याला सांगणे आहे असले चाळे बंद करा, ते काही दहशतवादी केंद्र नाही, दडपशाही बंद करा असा इशाराही जरांगें दिला आहे. तसंच आजपासून मराठे राष्ट्रपती पंतप्रधान, राज्यपाल याना ई-मेल करणार, दडपशाही थाबवा, आणि सगे सोयरे कायदा करा असा ई-मेल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *