मराठा आरक्षण निर्णयाचं राजपत्र जारी, ‘या’ तारखेपासून आरक्षण लागू

मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी. राज्यात मराठा आरक्षणाच्या  अंमलबजावणीला सुरुवात झालीय.. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय. त्यामुळे आता राज्यात मराठा आरक्षण लागू झालंय. विधीमंडळाने मराठा आरक्षण एकमताने मंजूर केलं होतं. SEBC या गटामध्ये मराठा आरक्षण देण्यात आलंय. या कायद्यानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आलंय..  हे आरक्षण राज्यातल्या सर्व सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी लागू असेल.

नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण 
विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने मराठा आरक्षण मंजूर करण्यात आलं. त्यानंतरआता शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलं आहे. यानुसार मराठा समाजाला  आता नोकरीत आणि शिक्षणात 10% आरक्षण मिळणार आहे. याशिवाय राज्यातल्या सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी 10% आरक्षण लागू होणार आहे.  सरकारी कार्यालयं, जिल्हा परिषदा, शाळा अशा सरकारी नोकरीत 10% आरक्षण मिळणार आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.  पण मराठ्यांना राजकीय आरक्षण नसेल तसंच केंद्रातही हे आरक्षण लागू नसेल असे देखील स्पश्ट करण्यात आले आहे.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल त्यासाठी महत्त्वाचा ठरलाय.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल त्यासाठी महत्त्वाचा ठरलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *