नायजेरियात मैदुगिरी शहरात बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात ५४ जण मृत्यूमुखी पडले असून ९० जण जखमी झाले आहेत. मात्र स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा ८५ हूनही अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, अजिलारी विभागातल्या विमानतळाजवळच्या मशिदीत नमाज चालू असताना हा बॉम्बस्फोट झाला. यावेळी काहीजण टिव्हीवर फूटबॉलचा सामना पहात होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या या बॉम्बस्फोटात ५४ जण मृत्यूमुखी पडले असून ९० जण जखमी झाल्याच्या वृत्ताला स्थानिक पोलिसांनी दुजोरा दिला आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
नायजेरियाचे राष्ट्रपती मुहम्मद बुहारी सत्तेत आल्यापासबन पूर्व नायजेरियातील मैदुगिरी शहरात बोको हरामचे दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणत आहेत.

