राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. शरद पवार बारामती लोकसभा मैदानात तळ ठोकणार आहेत.
शरद पवार बारामती लोकसभेसाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवार सलग चार दिवस विधानसभा मतदारसंघात बैठका घेणार आहेत. यावेळी ते पक्षाच्या सध्याच्या स्थितीचा घेणार आढावा घेतील. तसंच लोकसभा निवडणुकीसाठी नेमकी काय स्थिती आहे याचीही माहिती घेतील.
शरद पवार पहिल्या दिवशी 15 फेब्रुवारीला बारामतीत आढावा बैठक घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारीला दौंड मतदारसंघाची बैठक घेतील. यानंतर 17 फेब्रुवारीला इंदापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा, 18 फेब्रुवारीला पुरंदरला जाहीर सभा होईल. नंतर 19 फेब्रुवारीला पुण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील.
