पुण्यात आयकर विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या अॅण्टीकरप्शन विभागाने ही कारवाई केली आहे. सीबीआयच्या एसीबीने कार्यालयावर धाड टाकली तेव्हा त्यांना प्रिंटरमध्ये देखील पैसे सापडले.
सुशील शर्मा आणि सचिन कुमार यांना ५० हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. पुण्याच्या आयकर कार्यालयातले हे अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार सीबीआयला मिळाली होती.
या अधिकाऱ्यांच्या घर आणि कार्यालयाची चौकशी सुरू आहे. आयकर निरीक्षक सुशील शर्मा आणि सचिन कुमार यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

