मुंबईच्या समुद्रात संशयास्पद बोट आढळल्यानं खळबळ; तपासातून मोठी माहिती समोर

मुंबई शहरावर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहराच्या सर्व सीमांपासून महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत सगळीकडेच सुरक्षा यंत्रणांकडून चोख सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असलं तरीही शहरात घडणाऱ्या काही घटना मात्र यंत्रणांसह नागरिकांचीही चिंता वाढवताना दिसत आहेत. मुंबई शहरात नुकतीच अशी एक घटना घडली आणि यंत्रणा पुन्हा एकदा हादरल्या.

उपलब्ध माहितीनुसार अरबी समुद्रातून मुंबई पोलिसांच्या गस्त पथकाने कुवेतहून आलेली एक संशयास्पद बोट मुंबईच्या प्रवेशद्वारावर अडवली.  बोटीत तीन व्यक्ती असल्याची माहिती पुढील तपासातून मिळाली. पण, ते तिघंही भारतीय आहेत, असं पुढं स्पष्ट झालं.

सदर प्रकरणी गेटवे ऑफ इंडियावर चोरी केलेल्या कुवैती बोटीतील तीन तामिळ मच्छिमारांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. 2008 च्या मुंबईतील 26/11 हल्ल्यानंतर 16 वर्षांनंतर, या घटनेनंतर सुरक्षेतील त्रुटी पुन्हा उघडकीस आल्या आहेत. कठोर गस्त असूनही भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या सावध नजरेतून बोट कशी सुटली हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *