मुंबई ट्रांस हार्बर लिंकचा उद्धाटन सोहळा पडला महागात? 1300 लोकं पडले आजारी

शुक्रवारी मुंबई ट्रांस हार्बर लिंक (एमटीएचएल) चा उद्धाटन सोहळा पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी रोजी देशातील सर्वात लांब ‘एमटीएचएल’ या सागरी सेतूचे उद्घाटन केलं आणि यावेळी नवी मुंबईत जाहीर सभेला संबोधित केलं. या सोहळ्याला मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते. अशावेळी काही लोकांना उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि डोकेदुखीचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे.

रायगड जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नितीन देवमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील या भव्य कार्यक्रमानंतर सुमारे 1,300 लोक आजारी पडल्याची माहिती आहे.डॉ. देवमाणे यांनी सांगितलं की, ज्यावेळी अशा मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन होतं त्यावेळी काही लोंक आजारी पडण्याची शक्यता असते. अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या 1-2 टक्के लोकांना डिहायड्रेशन, डोकेदुखी, मळमळ इत्यादी काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील कार्यक्रमानंतर जवळपास 1,300 लोक आजारी पडल्याची माहिती आहे. दोन जणांना एका दिवसासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात  आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *