नागपुरात पत्नीने केली पतीची हत्या

नागपुरात पत्नीने केली पतीची हत्या

नागपुरात पत्नीने पतीची हत्या करत त्याचा मृतदेह राहत्या घरी खोलीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नंदनवन पोलिस स्टेशनअंतर्गत आझाद नगर परिसरात काल रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.

मजूर असलेले रमेश बानेवार आणि त्यांची पत्नी रंजना गेले ३ ते ४ दिवस परिसरात कोणालाही दिसले नव्हते. काल रात्री रमेश बानेवार यांच्या राहत्या घरातून तीव्र वास येऊ लागला. परिसरातील लोकांनी पोलिसाना सूचना दिली…

पोलिसांनी घराचे दार उघडून आत पाहणी केली असता तीव्र वास जमिनीच्या खालून येत असल्याचे लक्षात आले.  पोलिसांनी त्या ठिकाणी ५ फुट खोदकाम केले असता खड्ड्याच्या आत रमेश बानेवार यांचे मृतदेह पुरलेला आढळला किमान ३ ते ४ दिवस आधी त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचा  प्राथमिक अंदाज आहे.

विशेष म्हणजे रमेश बानेवार यांचे मृतदेह खड्ड्यात पुरल्यानंतर वरून सिमेंट आणि फारशी लाऊन पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न ही करण्यात आले होते  दरम्यान, परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश यांचे त्यांच्या पत्नी रंजना बानेवार सोबत नेहमीच भांडण व्हायचे मात्र, गेले ३ – ४ दिवस रमेश बानेवार दिसेनासे झाले होते आणि तेव्हापासूनच त्यांची पत्नी ही गायब झाली होती तिनेच आपल्या २ ते ३ इतर साथीदारांच्या मदतीने पती रमेश बानेवारची हत्या केली आहे असा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांनी पत्नी रंजना बानेवार आणि तिचे २ ते ३ अज्ञात सहकारी यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *