हिंजवडीचे माजी सरपंच आणि ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विशाल साखरे यांना गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य मयूर साखरे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल लक्ष्मण साखरे (४४, रा. हिंजवडी) असे मारहाण करण्यात आलेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ग्रामपंचायत सदस्य मयूर राजेंद्र साखरे, सूरज शिवाजी साखरे, राम नारायण साखरे, सुमीत पांडुरंग साखरे, रोहित कृष्णा जांभूळकर (सर्व रा. हिंजवडी) आणि ओंकार रामदास मेमाणे (रा. मारुंजी) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनमानी पद्धतीने कंत्राटे-शर्मा
मोपलवार यांची चौकशी करण्याची मागणी आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा- मेनन यांनी केली. ‘समृद्धी’ प्रकल्पातले घोटाळे बाहेर येऊ लागले होते, म्हणून मोपलवार यांनी वॉर रूम प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. मोपलवार यांनी समृद्धी प्रकल्पात मनमानी पद्धतीने कंत्राटे दिली होती. बहुतांश त्यांच्या नातेवाईकांना दिली होती, असा दावा त्यांनी केला.
राजकारणात सक्रिय झालेले अधिकारी
राज्याच्या सेवेतील अनेक अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर किंवा लवकर निवृत्ती स्वीकारून राजकारणात प्रवेश केला आहे. यात टी. चंद्रशेखर, माजी गृहनिर्माण सचिव रामाराव, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक व सत्यापाल सिंह, अरुण भाटिया, संभाजी झेंडे, प्रताप दिघावकर, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, माजी आमदार अहिरे, खासदार राजेंद्र गावित आदींचा समावेश आहे. या यादीत मोपलवार यांची भर पडणार आहे.
