एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्याला जाताना काळाचा घाला, ट्रकची धडक अन् दोघांनी जीव गमावला

गावातील एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधीसाठी दुचाकीवरून जात असलेल्या दोघांवर काळाने घाला घातला. ट्रक आणि दुचाकीची समोरा समोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. भोकर – उमरी मार्गावरील मोघाळी पाटीजवळ हा भीषण अपघात घडला. संजय बाबाराव जाधव (वय ४४) आणि श्यामराव पुंडलिक मिरासे (वय ५५) असं मृतांची नावे आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

 मृतक संजय जाधव आणि श्यामराव मिरासे हे भोकर तालुक्यातील हाडोळी येथील रहिवासी आहेत. शुक्रवारी दुपारी दोघेजण गावातील अंत्यविधी आटोपून दुपारी नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे मित्राच्या सासऱ्याच्या अंत्यविधीला दुचाकीने जात होते. भोकर-उमरी मार्गावरून जात असताना हा भीषण अपघात झाला. मोघाळी पाटीजवळ येताच समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की ट्रकच्या धडकेने दोघेजण फरफपत गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *