थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाची शक्कल; मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत बांधणार म्हाडाची घरं

एमएसआरडीसीकडील थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाने शक्कल लढवली आहे. एमएसआरडीसीच्या अंतर्गत येणाऱ्या  मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगतच्याजमीनीवर म्हाडा घर बांधणार आहे. यामुळे येत्या काही वर्षात  मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाच्या वसाहती दिसू शकतात. यामुळे महाराष्ट्रात नविन घरांची निर्मीती होणार आहे.

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाची घरं निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हाडाने एमएसआरडीसीकडून एक हजार कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. हे कर्ज थकीत असून त्या मोबदल्यात म्हाडाने एमएसआरडीसीच्या नवनगर प्रकल्पात जमिनी देण्याचा प्रस्ताव पाठवलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास म्हाडाला 701 किमी दरम्यान जमिनी मिळाल्या तर भविष्यात समृद्धीनगर म्हाडाची घरे निर्माण होतील आणि सर्वसामान्यांना ती सोडतीद्वारे उपलब्ध होतील.

समृद्धी महामार्गाचा 600 किमीचा टप्प्याचं काम पूर्ण झालं असून म्हाडा सातत्याने कर्जाच्या परतफेडीसाठी एमएसआरडीसीकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, सरकारने या कर्जाचं रुपांतर समभागात करण्याचा निर्णय घेतलाय…तर, समभागाऐवजी समृद्धीलगतच्या नवनगरांमध्ये गृहनिर्मितीसाठी जमिनींची मागणी म्हाडाने केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *