बुलढाण्यात धाडसी घरफोडी; सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास

मेहकर तालुक्यातील दुधा या गावात झालेल्या धाडसी घरफोडीत तब्बल ४ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. यामुळे मेहकर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे. दुधा येथील प्रेमकुमार रामराव सास्ते हे आपल्या परिवारासह घरात झोपले होते. यावेळी अज्ञात चोरट्यानी घराचे मागील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

यानंतर कपाटमधील ४० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा ४ लाख १५ हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *