अंधेरी येथील गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आज मध्यरात्री १.१० पासून ते उद्या (बुधवारी) पहाटे ४.४० पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे, हार्बर मार्गिकेवरील अप-डाऊन आणि पश्चिम रेल्वेच्या अप-डाउन धीम्या-जलद मार्गासह पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक असेल. परिणामी, मंगळवारी रात्री उशिरा धावणाऱ्या आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या आठ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
