वाशी आणि घणसोली स्टेशनवर थरार! मोबाईल चोराच्या पाठोपाठ धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि…

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना वाशी आणि घणसोली स्टेशन परिसरात घडल्या आहेत. मोबाईल चोराच्या पाठोपाठ धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याने एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. हा संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी  चोरट्याला अटक केली आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावर  ट्रेन मधून महिलांच्या हातातील मोबाईल खेचून पळून जाणाऱ्या घटनांमध्ये वाढ झालेय. गेल्या आठवड्यात आशा दोन घटना घडल्या होत्या.  वाशी आणि घणसोली रेल्वे स्थानकातून  महिलांच्या हातातली मोबाईल  खेचून चोरटे पसार झाले. मोबाईल चोराच्या पाठोपाठ धावत्या ट्रेनमधून उडी मारुन एक तरुणी जखमी झाली आहे.

काजल चंदनशिवे (24) असे जखमी तरुणीचे नाह आहे. काजल वाशीतील जुहूगावात राहते. काजल मुलुंड येथील आयटी कंपनीत कामाला आहे. मागील सोमवारी काजल नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेली होती. त्यानंतर रात्री 8 वाजता ती मुलुंड येथून वाशी येथे परत होती. यावेळी घणसोली रेल्वे स्थानकात  एक तरुण  ट्रेन मध्ये चढला आणि त्याने काजलच्या हातातील मोबाईल खेचून धावत्या ट्रेन मधून उडी मारली. या चोरट्याच्या  मागे काजलने देखील धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि ती प्लॅटफॉर्म पडली. या घटनेत काजल गंभीर जखमी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *