प्रकाश आंबेडकर यांना अटक करायला पाहिजे, नारायण राणेंची खळबळजनक मागणी

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करुन अटक व्हायला पाहिजे, असं विधान केलं आहे. राजकीयदृष्ट्या संपलेले लोक का बोलतात? त्यांनी घरी बसायला पाहिजे, असंही नारायण राणे म्हणाले.

पत्रकारांचा प्रश्न काय?

प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. त्यांनी तारीखही दिली आहे की तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत असं काही होऊ शकतं. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? पोलिसांना अलर्ट दिलाय का? असा प्रश्न पुण्यात पत्रकारांनी नारायण राणे यांना विचारला.

नारायण राणे यांचं उत्तर काय?

त्यांच्यावर (प्रकाश आंबेडकर) एफआयआर दाखल करुन त्यांना अटक व्हायला पाहिजे. माहिती जर कोणी लपवत असेल, तर तो क्राईम होतो. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. दंगलीचा आधार सांग… त्यांचं म्हणणं नाही म्हणू शकत कोण! इथे दंगल होणार.. तर प्रूफ द्यावा लागतो, कोण करणार? कशी दंगल होणार? कुठे करणार? राजकीयदृष्ट्या संपलेले लोक का बोलतात? त्यांनी घरी बसावं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *