सकाळच्या वेळी असणारी प्रदूषणाची धोकादायक पातळी, त्यामुळं व्यायमावर लागलेला विराम आणि त्याचे शरीरावर, जीनशैलीवर होणारे अनिष्ठ परिणाम या कारणांमुळं नागरिक हे टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. चर्चा आणि सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 10 पैकी 9 नागरिकांना वाढत्या प्रदूषणामुळं श्वसनाचा त्रास, खोकला, जीव घाबरा होणे, डोळ्यांची जळजळ अशा समस्या सतावू लागल्या आहेत.

स्वप्ननगरी मुंबई अशी ओळख असणाऱ्या या शहरामध्ये आजवर अनेकांनीच आसरा घेतला. या शहरानं अनेकांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हातभार लावला आणि खऱ्या अर्थानं देशाला आर्थिक पाठबळही दिलं. आर्थिकदृष्ट्या देश सक्षम होत असताना मुंबईनंही महत्त्वाची भूमिका बजावली. पण, आता मात्र अनेकांची कर्मभूमी आणि अनेकांचीच जन्मभूमी असणाऱ्या या मुंबईतून मोठ्या संख्येनं नागरिक शहर सोडण्याच्या विचारात असल्याची बाब समोर आली आहे.

शहरातील नागरिक का करतायत मुंबई सोडण्याचा निर्णय? 

मुंबईत सर्व सुखसोयी मिळतात असं म्हटलं जात असलं तरीही धकाधकीच्या या आयुष्यात शहरातील नागरिकांना मात्र अनेक अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागत आहे. परिणामी शहरातील दर 10 पैकी  6 नागरिक या शहरातूनच बाहेरच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या विचारात असल्याची बाब एका सर्व्हेक्षणातून समोर आली. दिल्लीतही हेच चित्र.

सकाळच्या वेळी असणारी प्रदूषणाची धोकादायक पातळी, त्यामुळं व्यायमावर लागलेला विराम आणि त्याचे शरीरावर, जीनशैलीवर होणारे अनिष्ठ परिणाम या कारणांमुळं नागरिक हे टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. चर्चा आणि सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 10 पैकी 9 नागरिकांना वाढत्या प्रदूषणामुळं श्वसनाचा त्रास, खोकला, जीव घाबरा होणे, डोळ्यांची जळजळ अशा समस्या सतावू लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *