मुंबईतील बहुमजली इमारतीत आज पहाटे भीषण आग लागली. भायखळा पूर्व येथील घोडपदेव विभागातील म्हाडा संकुलातील न्यु हिंद मिल कपाऊंडच्या ३ सी या २४ मजली इमारतीला आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीतील १३५ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर, आग विझवण्याचे काम अग्निशमन दलाकडून केले जात आहे.
