व्हा ‘व्हीआयपी’ प्रेक्षक!

व्हा ‘व्हीआयपी’ प्रेक्षक!

कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ११ आॅक्टोबरला होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा आनंद तुम्ही व्हीआयपी बॉक्समध्ये एअरकंडिशनर आणि शानदार जेवणासह घेऊ शकता; परंतु त्यासाठी तुम्हाला दीड ते तीन लाख रुपये मोजावे लागतील. त्यात तुम्ही सामन्याचा आनंद पूर्ण कुटुंबासह पिकनिकला गेल्यासारखा घेऊ शकाल.

ग्रीन पार्क स्टेडियममध्ये या वेळी पॅव्हेलियन बाल्कनी, डायरेक्टर पॅव्हेलियन आणि व्हीआयपी गॅलरी असे एकूण ३५ विशेष व्हीआयपी बॉक्स बनवले आहेत. या व्हीआयपी बॉक्सची विक्री आॅनलाईन उपलब्ध असेल. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सामन्यात या व्हीआयपी बॉक्सची संख्या कमी होती आणि त्याची किंमतही जवळपास अर्धी होती; परंतु या वर्षी बॉक्स आणि त्यातील सुविधा व किमतीतही वाढ झाली आहे. पण, या ३५ व्हीआयपी बॉक्सपैकी फक्त १५ बॉक्स सर्वसाधारण जनतेसाठी आहेत. उर्वरित बॉक्स राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि अन्य व्हीआयपींसाठी सुरक्षित असणार आहेत. डायरेक्टर पॅव्हेलियन बॉक्सची किंमत तीन लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यात १३ प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असेल. त्यात भोजन, पाण्याबरोबरच एसी आणि टीव्हीच्यादेखील सुविधा असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *