मुंबईहून पुणे गाठा फक्त 90 मिनिटांत, ट्रॅफिकचेही टेन्शन नाही, नवीन पुल खुला होतोय

मुंबईतील बहुप्रतीक्षीत असा मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) पूल पुढच्याच महिन्यात नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यातच हा पुल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. हा पुल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. त्याचबरोबर मुंबईहून पुणे गाठणे सोप्पे होणार आहे. जाणून घेऊया कसा आहे मार्ग.

मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक हा समुद्रावर उभारण्यात आला असून हा पूल 22 किमी लांब आहे. पुलाचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. 22 किमीपैकी 16 किमीपर्यंतचा भाग समुद्रावर बांधण्यात आला आहे. 25 डिसेंबर रोजी मुंबई ट्रान्स लिंक प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. एमटीएचएल पुल सुरू झाल्यानंतर मुंबईहून-नवी मुंबईपर्यंत पोहोचणे सोप्पे होणार आहे. त्याचबरोबर वाहतुक कोंडीपासूनही सुटका होणार यामुळं प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक पुल सुरू झाल्यानंतर मध्य मुंबईतून सेवरी ते नवी मुंबईच्या चिरलेपर्यंतचा प्रवास अगदी 15 ते 20 मिनिटांत होणार आहे. एमटीएचएल पुल सुरू झाल्यानंतर मुंबई आणि पुणेपर्यंतचा प्रवासही सोप्पा आणि जलद होणार. लोणावळा- खंडाळा आणि मुंबईपर्यंतचा प्रवास 90 मिनिटांत होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *