नागपूर जिल्ह्याला शुक्रवारी रात्री पावसाने झोडपल्याने अंबाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला. त्यामुळे शहरातील अनेक नाल्यांना पूर आल्याने अंबाझरी, डागा ले-आऊट, शंकरनगरसह अनेक भागात पूर व पावसाचे पाणी तुंबले. परिणामी, महावितरणचे जिल्ह्यात ४५ लाखांचे नुकसान झाले. त्यापैकी सर्वाधिक ८० टक्के हानी शहरी भागात झाली आहे.
महावितरणच्या नागपूरसह विविध भागातील वीज देयक भरणा केंद्रावर बुधवारी एकाही ग्राहकाकडून दोन हजार रुपयांच्या नोटा वीज देयकापोटी स्वीकारण्यात आल्या नाही. त्यामुळे ग्राहकांना एकतर दुसऱ्या नोटा देणे अथवा परत बँकेत जाऊन नोटा बदलून देयक भरावे लागले. महावितरणने २८ सप्टेंबरला ईद आणि अनंत चतुर्दशीची सुट्टी असल्याचे कारण सांगत २७ सप्टेंबरलाही दोन हजारांच्या नोटा स्वीकारल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तर दुसरीकडे एसटी महामंडळानेही २८ सप्टेंबरपर्यंत प्रवास भाड्यापोटी नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २८ सप्टेंबरनंतर एसटीकडूनही दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने मुदत वाढवल्यास वरिष्ठांच्या सूचनेनुसार नोटा स्वीकारण्याबाबत निर्णय होणार असल्याचे दोन्ही विभागातील स्थानिक अधिकारी सांगत आहेत.
संबंधित अधिकारी अडचणीत येणार?
महावितरण आणि एसटी महामंडळाकडून संबंधित अधिकाऱ्यांना कोणत्याही स्थितीत दोन हजारांच्या स्वीकारलेल्या नोटा संबंधित बँकेत २९ सप्टेंबरच्या पूर्वी भरण्याच्या सूचना आहे. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
