दक्षिण मुंबई ते भाईंदर सिग्नलमुक्त प्रवास! सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याला गती; कधी पूर्ण होणार?

मुंबईसह महामुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजना आणि प्रकल्प हाती घेतले जात आहेत. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांनाही गती देण्यात असून यात सागरी किनारा मार्गाचाही समावेश आहे. या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण असा दुसरा टप्पा म्हणजे, वांद्रे ते वर्सोवा मार्च २०२८, तर वर्सोवा ते भाईंदर डिसेंबर २०२८पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी याबाबतची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांकडून कामाची पाहणी

मुंबई सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची फडणवीस यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोखंडवाला रोटरी मिल्लतनगर नर्सरी (पॅकेज अ), मालाड माइंडस्पेस इंटरचेंज (पॅकेज ब), चारकोप मरिना एन्क्लेव्ह (पॅकेज क आणि ड) आणि चारकोप सेक्टर-८ (पॅकेज इ) येथील कामांची मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी सागरी किनारा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबईतील ६० टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती मार्गावरून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *