मुंबईत एअरहोस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या, गळफास घेऊन संपवलं आयुष्य

मुंबईतल्या मरोळ भागातील एका आलिशान इमारतीत राहणाऱ्या २५ वर्षीय एअरहोस्टेसची रविवारी विक्रम सिंह अटवालने धारदार सुऱ्याने हत्या केली. विक्रम अटवाल हा त्याच इमारतीत हाऊस किपिंगचं काम करत होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्यानंतर आता त्याने गळफास घेऊन त्याचं आयुष्य संपवलं आहे.

काय आहे हे प्रकरण?

मरोळ परिसरातील के. मारवाह मार्गावरील एन. जी. कॉम्प्लेक्स सोसायटीतील घरात एअर होस्टेस रुपल ओग्रे ही तरूणी तरूणी रविवारी मृतावस्थेत आढळली. ती ट्रेनी एअर होस्टेस होती. मुळची छत्तीसगडची असलेली रुपल एप्रिल २०२३ मध्ये नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आली होती, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी विक्रम तिच्यावर बलात्कार करण्याच्या निमित्ताने घरात शिरला होता. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये त्याने तरूणीच्या गळ्यावर सुऱ्याने वार केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विक्रमला अटक केली. विक्रम सिंह अटवालने आता तुरुंगातल्या शौचालयात आत्महत्या केली आहे.

मुंबईतल्या अंधेरी या ठिकाणी त्याला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथल्या शौचालयात पँटच्या मदतीने गळफास घेऊन आरोपी विक्रम अटवालने आयुष्य संपवलं. या प्रकरणी गुन्हे शाखा पुढील तपास करते आहे.

पोलिसांनी जेव्हा विक्रमला अटक केली तेव्हा त्याने ही माहिती दिली की एअरहोस्टेस रुपलची हत्या केल्यानंतर त्याने चाकू आणि त्यादिवशी घातलेले कपडे हे इमारतीच्या झुडुपांमध्ये फेकले होते. विक्रमला अटक करण्यात आल्यानंतर ८ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान रुपलच्या घरातल्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांच्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यांनी मंगळवारी रुपलचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तो छत्तीसगढ या ठिकाणी नेला आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली.

बलात्काराच्या उद्देशानेच शिरला होता घरात

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं सांगितलं, “त्याने पोलिसांसमोर कबूल केले की तो महिलेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने घरात घुसला होता.” पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने आपल्या कपड्यात सुरा लपवला होता. पीडितेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने तो घरात घुसला. पण तिने प्रतिकार केल्याने त्याने घाबरून तिचा गळा चिरला. दरम्यान, पीडितेनं आरोपीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर ओरखडे ओढले.

पोलिसांनी दावा केला की, आरोपी अटवाल आणि पीडितेमध्ये शुक्रवारी आणि रविवारी सकाळी शाब्दिक वाद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्रम अटवाल याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता विक्रम अटवालने त्याचं आयुष्य संपवलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *