खंडणीप्रकरणी निलंबित करण्यात आलेले पोलीस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नेमणूक करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना निलंबित करण्यात आले होते.
सत्तापालट झाल्यानंतर गेल्याच महिन्यात त्रिपाठी यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर गृह विभागाने सोमवारी त्रिपाठी यांच्या पदस्थापनेचे आदेश काढले आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्तपदी नियुक्ती केली.