सोपे टास्क देऊन बँक खाती रिकामी करण्याचे प्रकार सायबरचोरांकडून सुरूच आहेत. पोलिसांकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करूनही नागरिक विशेषतः उच्चशिक्षित तरूण सायबरचोरांच्या जाळ्यात अडकत आहेत. एका कंपनीत मॅनेजर असलेल्या दक्षिण मुंबईतील तरूणाने तब्बल ३९ लाख रूपये टास्कच्या नादात गमावले. मुंबईतील वेगवेगळ्या भागांत आठवड्याभरात अनेकांची टास्कच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे.
सागरला पैशाची गरज भासली तेव्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता कर भरायला लागेल सांगून आणखी पैशाची मागणी केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे सागरच्या लक्षात आले आणि त्याने सायबर पोलिसांत तक्रार केली.
आठवड्याभरातील फसवणुकीच्या घटना
भायखळा : हेल्थकेअर कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणाला आठ लाखांचा गंडा.
ओशिवरा : ठाण्यात नोकरी करणाऱ्या जोगेश्वरीच्या महिलेला सात लाखांना फसविले.
चेंबूर : टास्कच्या नावाखाली एक लाख २७ हजारांची फसवणूक करण्यात आली.
जुहू : संस्थेतील मॅनेजरला घरबसल्या कमविण्याचा मोह अडीच लाखांना पडला.
दहिसर : गृहपयोगी वस्तूच्या व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने दोन लाख गमावले.
