अमेरिकन स्टाईलचं केळवण

अमेरिकन स्टाईलचं केळवण

‘शॉवर्स’ मग ते पावसाचे असोत किंवा अन्य कुठल्या रूपातले असोत, कोणाला आवडत नाहीत?  शॉवर म्हणजे वर्षाव.  हा शब्द अमेरिकेत तरी सुखद गोष्टींनाच जोडलेला आहे.
अमेरिकेत राहायला लागल्यावर खास इथले असे बरेच सण, समारंभ ओळखीचे होऊ लागतात. कुठेतरी त्यांच्याशी आपल्या भारतातल्या सण, समारंभांची सांगडही घालावीशी वाटते. केळवण, डोहाळे जेवण, बाळांचं बोरन्हाण असे काही मराठी समारंभ मराठी लोक आपला खास  ‘भारतीय टच’ देऊन साजरा करतात.
  ‘ब्रायडल शॉवर’ अमेरिकेत गेली 100 वर्षे तरी साजरा होत आहे. मुलांनी आणि मुलींनी आपली लग्नाची तारीख ठरवली, की ब्रायडल शॉवरची तारीख ठरते. केळवणाचाच प्रकार हा. पण नवरा-मुलगा किंवा इतर कोणीही पुरुष या समारंभाला नसतात. वधूच्या खास मैत्रिणी हा समारंभ करतात. ज्यांना लग्नाला आमंत्रण असते अशाच बायकांना (जास्तीकरून मैत्रिणींना) ब्रायडल शॉवरला बोलावतात. वधूच्या आई, बहिणी आणि जवळच्या नातेवाईक महिलावर्गालाही आमंत्रण असतं.
लग्न ठरलं, की भावी वधू-वर आपल्या आवडीच्या दुकानामधे (कधी कधी एकापेक्षा जास्त दुकानांमधेही) रजिस्ट्री ठेवतात. रजिस्ट्री म्हणजे त्या दुकानात असलेल्या सामानातून वधू-वर त्यांना हवं असलेलं सामान निवडतात. सामानाची प्रिंटेड लिस्ट प्रत्येक वस्तूच्या किमतीसह वधू-वरांच्या नावासोबत दुकानात ठेवलेली असते. लग्नाचा अहेर देताना देणा:याला आणि घेणा:याला हे खूपच सोयीचं होतं. (माङया मैत्रिणीला तिच्या लग्नात अहेर म्हणून तीन मिसळणाचे डबे, दोन चहाची भांडी आणि तीन-चार तुपाच्या तांबल्या आलेल्या मला चांगल्या आठवतात.) रजिस्ट्रीमधून अहेर निवडायचं बंधन मात्र नसतं. हल्ली बरेच वेळा आमंत्रणामधेच अहेर म्हणून फक्त पैसे (शक्यतो चेक) द्यावेत, अशीही विनंती केलेली असते.
ब्रायडल शॉवर म्हणजे चेष्टामस्करी, गाणी, डान्स, गेम्स, मेजवानी (लंच किंवा भरपेट स्नॅक्स), प्रेङोंट्स (रजिस्ट्रीमधली किंवा वेगळी) असा सगळा अनौपचारिक समारंभ असतो.
शॉवरच्या भरपूर आधी आमंत्रणाची स्पेशल करड छापली जातात. कार्डावर तारीख, वार, ठिकाण असं सगळं लिहिलेलं असतं. हल्ली त्याच्या जोडीला वधूची अहेराबद्दलची विनंतीही असते. समारंभाला आपण जाणार किंवा नाही हे प्रत्येक आमंत्रिताने वेळीच कळवायचं असतं. फक्त महिला (जास्तीकरून समवयस्क आणि बहुतेक वेळा एकमेकींना ओळखणा:या) असल्यानं सगळा समारंभ बहुतेक वेळा अनौपचारिक असतो. खाणंपिणं करत करत गमतीचे खेळ, हास्य-विनोद करत शेवटी प्रेङोंट्स उघडायचा कार्यक्र म होतो. लहान-मोठय़ा प्रत्येक प्रेङोंटचं सगळ्याजणी मनापासून कौतुक करतात. दिल्यादिल्या प्रेङोंट्स उघडून सर्वाना दाखवत त्याचं मनसोक्त कौतुक करायचं हा अमेरिकन रिवाज इथेही असतोच. कार्यक्र म संपल्यावर प्रेङोंट्स नीट ठेवून एकदोन आठवडय़ात प्रत्येक मैत्रिणीला प्रेङोंटचं कौतुक करणारं ‘थॅँक्यू कार्डं’ जरूर पाठवलं जातं. शॉवरची पार्टी संपल्यावर परत जाताना प्रत्येकीला वधूकडून छोटीशी आठवण-भेट नक्की मिळते.
भारतातून अमेरिकेला कायमचं वास्तव्य करायला गेलेले लोक फार नाहीत. (अमेरिकेच्या लोकसंख्येमधले फक्त एक टक्का लोक भारतीय आहेत.) मराठी-भाषिक आणखीनच कमी. त्यातही जास्ती लोक न्यूयॉर्क-न्यूजर्सी आणि कॅलिफोर्नियात! आमच्या साउथ फ्लोरिडामधे राहणा:या माङया मैत्रिणी ब:याच विखुरलेल्या आहेत.
माङया मुलीचं लग्न ठरलं, कोर्ट मॅरेज, नंतर घरात सत्यनारायणाची पूजा आणि एका पंचतारांकित हॉटेलमधे डिनर असा कार्यक्रम होता. डिनर पार्टीची आमंत्रणं खूप आधी गेली होती. आमंत्रणाच्या पत्रिकेत अहेर न देण्याची विनंती केली होती. (भारतात अहेर न घेण्याची प्रथा आता बरीच परिचित झाली आहे. अमेरिकेत मात्र अजूनही भारतीय लोक अहेर स्वीकारतात.)
आमच्या मुलीची पत्रिका वाचून माङया मैत्रिणी विचारात पडल्या. मग त्यांनी एक गमतीचा समारंभ केला. अमेरिकेतलं ‘केळवण’च होतं ते. एक दिवस ठरवून 15 मैत्रिणी आल्या. या कार्यक्रमात पुरुषांना मज्जाव होता. समारंभाकरता लाल, हिरवा आणि पिवळा असे तीन रंग ठरवले होते. आम्हालाही ते आधीच सांगितले होते. आजींसकट आम्ही सगळ्या पिवळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या साडय़ा नेसलो. माङया मैत्रिणी 11 च्या सुमारास आल्या. दोघींनी टेबल सेट केलं. आणखीन दोघींनी घरातल्या सामानाची जरा फिरवाफिरवी केली. तिघी-चौघींनी रांगोळी, पुष्परचना आपल्या हातात घेतली. सवर्ि्हगची भांडी, त्यातले पदार्थ, ग्लासेस, पेपर प्लेट्स, नॅपकिन्स, टेबलाच्या मध्यभागी ठेवलेलं पुष्प-पात्र, त्यातली ताजी फुलं, जेवणाच्या आधी सव्र्ह केलं गेलेलं पन्हं, जिलबी-मसालेभाताचं जेवण. सगळं कलर कोडेड. प्रवेशदारातून घरात आल्यावर काढली गेलेली फुलांची रांगोळीही याला अपवाद नव्हती. हॉलच्या सीलिंगपासून लावलेली डेकोरेशन्सही याच तीन रंगांमधली. टेबल सेट करण्यापासून समारंभानंतर घर ‘जैसे थे’ लावून टाकण्यार्पयत सगळं माङया सख्यांनीच केलं. माझी मुलगी दुस:या गावात राहत असल्यानं तिच्या मैत्रिणी नव्हत्या. पण म्हणून समारंभाची रंगत मुळीच कमी झाली नाही. जेवणाच्या आधी सगळ्यांनी उखाणो घ्यायचं फर्मान कुसुमताईंनी (या आमच्या ग्रुपच्या लीडर) केलं. नांव घेणं हा प्रकार माङया मुलीला  हिलेरिअस वाटला. एरवी नव:याला अरे-तुरे करणा:या, वेळोवेळी त्याच्यावर डाफरणा:या सगळ्या मावशा दोन ओळींच्या कवितेमधे नव:याचं नाव आदरानं घेतात हे तिनं आधी कधी न ऐकलेलं, पाहिलेलं होतं. माङया मैत्रिणींनी तिलाही शेलके उखाणो शिकवले. आधी सांगितल्याप्रमाणो प्रत्येकीनं आपल्या लग्नाचा आल्बम, काही फोटो असं आणलं होतं. बॅकग्राउंडला गंगा-यमुना डोळ्यात उभ्या का, नव वधू प्रिया मी, उंबरठय़ावर माप ठेविले अशा जुन्या गाण्यांची टेप सुरू होती. हॉलच्या एका बाजूला मुलीचा ‘ट्रसो’ (पाठवणी करताना आई-वडिलांनी दिलेला सगळा अहेर) मांडला होता. सगळ्याजणी आल्बम बघता बघता 15, 2क्, 25  वर्षे मागे गेल्या. आपल्या लग्नासंबंधीची एखादी आठवणही प्रत्येकीनं सांगायची होती. काही जणींचा प्रेमविवाह होता, काहींचं घरातून ठरवलेलं लग्न होतं, आणि एक  मैत्रीण घटस्फोटित होती. लग्नाच्या नव्या नवलाईच्या प्रत्येकीच्या आठवणी मात्र रम्य होत्या. माङया मुलीने एक सुंदर नोटबुक आणलं होतं. प्रत्येक मावशीला, आजीला, मला सगळयांना तिनं एक ‘पीस ऑफ अॅडव्हाईस’ त्या नोटबुकमधे लिहायला सांगितला. तिचं पाक-कौशल्य आणि स्वयंपाक करण्यातला इंटरेस्ट आजीला चांगलाच माहीत होता. नोटबुकच्या पहिल्याच पानावर आजींनं लिहिलं-  ‘अन्नपूर्णा हो’.
ब्रायडल शॉवरला बोलावलेल्या मैत्रिणींना रिटर्न गिफ्ट देण्याचं मी आधीच ठरवलं होतं. या आगळ्या वेगळ्या ब्रायडल शॉवरला मी माङया मैत्रिणींना बांगडय़ा द्यायचं ठरवलं. एका ट्रेमधे वेगवेगळ्या साईज आणि लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाच्या  मेटलच्या बांगडय़ा ठेवल्या होत्या. प्रत्येकीनं हव्या तशा बांगडय़ा निवडून घेतल्या. घरातलं फर्निचर होतं तसं ठेवून माङया मैत्रिणी खूप आनंदी आठवणी (काही व्हिडिओ शूटिंग आणि फोटोंच्या रूपात) मागे सोडून परत घरी गेल्या. माङया मुलीला तिच्या लग्नासाठी मिळालेली ही ‘ब्रायडल शॉवर’ची गिफ्ट अगदी अनोखी वाटली हे आणखी महत्वाचं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *