बेस्ट उपक्रमातील (BEST) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. अखेर मुख्यमंत्र्यांसोबत (CM Eknath Shinde) झालेल्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि संपाबाबत चर्चा केली. या चर्चेत मागण्या मान्य झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. बेस्टच्या 19 आगारांमधील कंत्राटी कामगारांनी मिळून एक शिष्टमंडळ बनवलं होतं.
