गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयिताला अटक

गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयिताला अटक

मागच्या अनेक महिन्यांपासून चाचपडत असलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात एका संशयित आरोपीला सांगलीतून अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्या आरोपीच नाव समीर गायकवाड असून, तो सराईत गुन्हेगार असल्याच बोलल जातय. कोल्हापूर आणि सांगली पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत पहाटेच्या सुमारास समीर गायकवाडला सांगलीतून अटक केली.

न्यायालयाने समीरला सात दिवसांची २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. समीर गायकवाडचे फोन कॉल्सचे रेकॉर्ड तपासून त्याला अटक करण्यात आली.

यावर्षी १६ फेब्रुवारीला कॉम्रेड पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा मॉर्निंगवॉकवरुन घरी परतत असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळया झाडल्या होत्या. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते.

उमा पानसरे या प्राणघातक हल्ल्यातून बचावल्या. मात्र गोविंद पानसरे यांचे २० फेब्रुवारीला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा राज्यभरातून निषेध झाला होता.

पानसरेंच्या मारेक-यांना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथक बनण्यात आली होती. मात्र मारेक-यांना पकडण्यात यश येत नव्हते. समीर गायकवाडच्या अटकेने या प्रकरणाच्या तपासात प्रगती होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *