माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील (Snake video) मातोश्रीवर विषारी साप आढळून आला. वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेक्शन अँड रेस्क्यू असोसिएशन संस्थेला या सापाची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्पमित्रांकडून या चार फुटाच्या सापाला रेस्क्यू करण्यात आलं. सापाला पकडताना खुद्द उद्धव ठाकरे इथे उपस्थित होते.
या सापाला पडकल्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
दरम्यान गेल्या महिन्यात खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या मुंबईतील घरात साप निघाला होता. भांडूपमधील निवासस्थानी संजय राऊत पत्रकार परिषद घेत असताना हा साप निघाल्यामुळे एकच खळबळ माजली.
