मुंबई-दिल्ली विमानतळावर घातपाताची धमकी, सुरक्षा यंत्रणांची उडाली तारांबळ

मुंबई व दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानतळावर बॉम्बस्फोट अथवा मोठा घातपात घडविण्यात येणार असल्याचा दूरध्वनी हरियाणा पोलिसांना आला होता. त्यांनी याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिल्यानंतर विमानतळावरील यंत्रणांना सतर्क करण्यात आले. पण त्यात काही तथ्य आढळले नाही.

 उद्योग विहार गुरग्राम पोलिसांनी याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यांना याप्रकरणी शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एक दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील आंतरराष्ट्रीय व व देशांतर्गत विमानतळावर शुक्रवारी रात्री बॉम्बस्फोट अथवा मोठी घातपाती कारवाई होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर हरियाणा पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. त्यामुळे मुंबई विमानतळावर कार्यरत यंत्रणा, गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. पण तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *