मुंबईत इमारतीच्या सातव्या मजल्यावर सापडला कोब्रा साप

गोरेगावमधील  एका निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एक कोब्रा सापाचे पिल्लू सापडलं आहे. याची माहिती मिळाल्यानंतर वन्यजीव संघटनेच्या सदस्यांनी त्याची सुरक्षित ठिकाणी सुटका केली आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वीसुद्धा एका बंद इमारतीमध्ये  चार फूट लांब साप आढळल्याने खळबळ उडाली होती. मंगळवारी दुपारी रॉयल पाम्स हाऊसिंग सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये हे सापाचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफला संघटनेला संपर्क साधण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ रॉयल पाम्स हाऊसिंग सोसायटीमध्ये धाव घेतली आणि कोब्राचे पिल्लू नैसर्गिक अधिवासात सोडलं.

‘RAWW च्या पथकाला या घटनेच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि घाबरलेल्या रहिवाशांना मदत करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते,’ असे , RAWW चे संस्थापक-अध्यक्ष  महाराष्ट्र वन विभागाचे मानद वन्यजीव कर्मचारी पवन शर्मा यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *