करायला गेले एक आणि झालं भलतचं! उजव्या पायावर उपचार करायला गेले अन्…

नाशिकमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये उजव्या पायातील रॉड काढण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या डावा पाय कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक रोड परिसरात असलेल्या एका रुग्णालयात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमधील वयोवृद्ध कर्मचाऱ्यासोबत ही घटना घडल्यानंतर मॅग्नम रुग्णालयामधील डॉक्टरविरोधात पोलिसांत  निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर विपुल काळे असे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टर विपुल काळे यांच्या निष्काळजीपणामुळेच आपण दोन्ही पायांनी अधू झाल्याचे पीडित रुग्णाचे म्हणणे होते. रुग्णाच्या तक्रारीनंतर जिल्हा रुग्णालय अहवालावरुन उपनगर पोलीस ठाण्यात कलम 337 व 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबियांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दोन ते तीन महिन्यांनंतर हा गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता रुग्णालयावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पीडित व्यक्तीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *