गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने शनिवारपासून मुंबई परिसरात आणि धरणक्षेत्रातही विश्रांती घेतली आहे. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस पडला आहे. गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस यंदा मुंबईत पडला आहे. पालघर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरणे काठोकाठ भरली असून मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठाही ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. मात्र तरीही पाणी पुरवठ्याची चिंता कमी झालेली नाही.
