नंतर, त्याने महिलेला धमकावणे सुरू केले की आपण व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केले आहेत आणि ते सोशल मीडियावर अपलोड करु, अशी धमकी तो देऊ लागला. तसेच तक्रारदाराकडे महिलेकडे पैशांची मागणी करू लागला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
सुरुवातीला आपल्या प्रतिष्ठेला घाबरलेल्या महिलेने आरोपीला 70 हजार रुपये दिले. मात्र, आरोपीने तिच्याकडे आणखी पैशांची मागणी सुरुच ठेवली. आता आरोपीची हाव अजून वाढली होती. त्याने महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली आणि व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी दिली.
तेव्हा महिलेने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. जिथे जीम ट्रेनरविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. तिने दिलेल्या तपशिलांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि शनिवारी रात्री त्याला अटक केली.
आरोपी जीम ट्रेनर हा महिलेला एका महिन्याहून अधिक काळ धमकावत होता. शेवटी न राहवून तिने तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
नोरा फतेही, सनी लिओनीनसोबत ‘शो’ चे खोटे स्वप्न
आपल्या सेलिब्रिटींसोबत ओळखी आहेत वैगेरे सांगून लुटण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये आरोपींकडून 9 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
