खाद्यतेल स्वस्त होणार! मोदी सरकारच्या प्रयत्नांना अखेर यश; खिशाला बसणारी ‘फोडणी’ टळणार

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी बुधवारी सांगितले की परिष्कृत सूर्यफूल तेल, रिफाइंड सोयाबीन तेल आणि आरबीडी पामोलिअनच्या किमती गेल्या वर्षभरात लक्षणीयरीत्या घसरल्या आहेत, ज्यामुळे आर्थिक आव्हानांदरम्यान सर्वसामान्य ग्राहकांना आवश्यक असा दिलासा मिळाला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार रिफाइंड सूर्यफूल तेल २९% तर रिफाइंड सोयाबीन तेल १९ टक्क्यांनी आणि पामोलिन तेल २५ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.

सर्वसामान्य ग्राहकांना फायदा झाला
कच्चे सूर्यफूल तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे पामोलिन तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत घसरण झाल्याबरोबरच सरकारने उचललेल्या पावलांमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असू गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमतीत बरीच घट झाली आहे. राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, परिष्कृत सूर्यफूल तेल, रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड पामोलिन तेलाच्या किमती अनुक्रमे २९.०४ टक्के, १८.९८ टक्के आणि २५.४३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *